1 नोव्हेंम्बर काळ्या दिनाच्या जनजागृती साठी शहरातील नेते केवळ ग्रामीण भागात जनजागृती बैठका घेत असल्याच वृत्त प्रसिद्ध केल होत. या बेळगाव live च्या बातमीची दखल घेण्यात आली असून शहरातील दक्षिण भागात देखील बैठकीचे आयोजन केले आहे
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी बैठका होत होत्या अखेर समिती नेत्यांनी बेळगाव दक्षिण भागात जनजागृती बैठकीचे आयोजन केले आहे.
उद्या रविवार ता.29/10/2017 रोजी श्री राममंदिर पिरनवाडी येथे संध्याकाळी ठीक 6 वाजता 1 नोव्हेंबर काळादिन व 13 नोव्हेंबर महामेळावा यशस्वी करण्यासाठी जनजागृती बैठक आयोजित केली आहे.बैठकिला मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती म.ए.समितीचे अध्यक्ष दिपक दळवी , कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे , आणि बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू मुतगेकर हजर रहाणार आहेत.बैठकीसाठी वाघवडे,मच्छे,पिरनवाडी, झाडशापुर, संतीबस्तवाड ,हुंचेनट्टी, बाळगमटृी ,खादरवाडी, महावीर नगर,मजगांव, येथील कार्यकर्त्यांनी , युवकांनी ,मोठ्या संख्येने हजर राहण्याचे अवाहन आर. के.पाटील (a.p.m.c सदस्य) संजय सातेरी, अप्पाजी मुंचडीकर,रमेश करेन्नावर यांनी केले आहे.
1 नोव्हेंबर काळादिन सहभागी होऊन , ‘एक मराठा लाख मराठा’ धर्तीवर हा निषेध मुकमोर्चा अत्यंत शांततेत व संयमाने निघणार असून मोर्चात
मराठी एकजुट , मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी अस्मिता दर्शन घडविण्यासाठी उद्याच्या जनजागृती बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अस देखील आवाहन केलं आहे