विधानसभा अधिवेशन काळात बेळगाव आणि परिसरातील सर्व लॉज सरकारी सेवेसाठी खुली ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवा, स्वच्छता राखा आणि चांगल्या दर्जाचे जेवण द्या असा आदेश देण्यात आला आहे.
आमदार, मंत्री,सरकारी कर्मचारी, पोलीस आणि अधिवेशनात सहभागी होणाऱ्या मंडळींच्या वास्तव्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
नुकतीच हॉटेल आणि लॉज मालकांची भेट घेऊन जिल्हाधिकारी एस झिया उल्ला यांनी ही सूचना केली आहे. अधिवेशन काळात मंत्री व आमदार वगळता मार्शल, अधिकारी व इतर अनेक मंडळी बेळगावात दाखल होतील, १५०० ते २००० लोकांच्या वास्तव्याची सोय करावी लागणार आहे. यामुळे हॉटेल्स बरोबरच गेस्ट हाउस व कल्याण मंडप सारख्या ठिकानांचीही पाहणी सुरू आहे.
Trending Now