पोलीस हा नागरिकांचा पहिला मित्र असला पाहिजे, चुका केल्या तर साऱ्यांनाच झोडणारा पण इतरवेळी एखाद्या मातेप्रमाणे जपणारा पोलीस अधिकारी मिळाला तर त्यात जनतेचे कल्याण असते.
मात्र असे अपवादात्मकच घडत असते, सध्या शहापूर पोलीस स्थानकात सेवा बजावणारे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी याच प्रकारात मोडतात. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शहापूर चा सिंघम अशी मान्यता मिळवली आहे.
पोलिसाला जात, पात, धर्म असे भेद नसतात. यामुळे स्वतः मुस्लिम असूनही इतर धर्मियांचा आदर करीत जावेद मुशापुरी सलोखा जपण्याचा प्रयत्न करत आले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचा सहभाग दोन धर्मीयांत सलोखा आणून गेला आहे.
जावेदभाई हे घरात झोपून इतर हाताखालील पोलिसांना ऑर्डर सोडणाऱ्यांपैकी नक्कीच नाहीत. आपल्या पोलीस स्थानकात बंदोबस्त करताना ते वेगवेगळ्या कल्पना लढवत त्यात स्वतः सर्वात पुढे उभे असतात.
सध्या त्यांनी रात्रीची गस्त पायी घालण्याचा नवा पायंडा सुरू करून त्यात स्वतः सहभाग घेतला आहे, यामुळे शहापूर पोलीस स्थानक हद्दीतील नागरिक शांतपणे झोप घेऊ शकत आहेत.
जनतेत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतात.गणेशोत्सव काळात तर तहान भूक,झोप विसरून मंडळाच्या कार्यकर्त्यासंवेत सदैव संवाद साधून सारे शांततेत होईल याची काळजी घेतली.पोलीस स्थानकात आलेल्या व्यक्तीशी आदराने बोला,त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या अशी पोलिसांना त्यांनी सूचना केली आहे.जीपमधून जात असताना काहीतरी गडबड दिसली तर आपली हद्द नसताना देखील तेथे थांबून प्रकरण मिटवूनच पुढे जातात.समस्या सोडवण्यासाठीच आम्ही आहोत,आम्ही तुमचे मित्र आहोत असा विश्वास जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केलाय.
स्वतः होऊन नागरिकांत मिसळणे, त्यांचे सणवार, उत्सव साजरे करणे आणि त्यांच्या सुख दुखात साथ देणे हे पोलिसिंग ते करत आहेत, यामुळे अल्पकाळात ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असून नक्कीच शहापूर पोलीस स्थानकाचे सिंघम बनले आहेत त्यांच्या विधायक उपक्रमांना बेळगाव live च्या शुभेच्छा….