१ नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस सत्र सुरू झाले आहे. दडपशाही चा हा प्रकार सीमाभागात संतापजनक ठरत आहे
सध्या मालोजी अष्टेकर (महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष), दीपक दळवी (मध्यवर्ती म ए समिती अध्यक्ष),मनोहर किनेकर (तालुका म ए समिती ), निंगोजी हुद्दार (तालुका म ए समिती अध्यक्ष), यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना खडे बाजार पोलिसांनी नोटीस बजावली आहे, अशी माहिती मिळाली.
कलम १०८ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या साऱ्यांना २६ तारखेला पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
मराठी भाषिकांवर कानडी सरकारची दडपशाही सुरू झाली आहे.