जस जसा काळा दिन जवळ येत आहे तस तशी कर्नाटक शासनाने दडपशाही सुरुच केली आहे.मागील वर्षीच्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीच्या दरम्यान सोशल मिडियावर दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत खडे बाजार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
केदारी करडी रा. मच्छे मारुती पाटील रा बेनकनहळळी या दोघा मराठी भाषिक युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना खडे बाजार पोलिसांनी अटक केली आहे. जे एम एफ सी चतुर्थ कोर्टात त्यांना हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
153अ दोन भाषिकात तेढ निर्माण करणे असा ठपका पोलिसांनी दोन कार्यकर्त्यां वर ठेवला आहे.खडे बाजार पोलीस निरीक्षक यु ए सातेंनहल्ली यांनी ही कारवाई केली आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या युवकांवर अंकुश ठेवण्यासाठीच दडपशाही करत पोलिसांनी मराठी भाषिक युवा आघाडीच्या युवकांना शासनाने टार्गेट केले आहे अशी प्रतिक्रिया मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर सीमा प्रश्नी जनजागृती करताना लोकशाहीच्या मार्गातूनच कोणाच्याही भावनाना ठेच न पोहोचवता कशी जनजागृती करता येईल याकडे देखील मराठी युवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असं मत देखील व्यक्त केले जात आहे.