खासदार सुरेश अंगडी यांनी ब्रिज बांधकामांचा आढावा घेताना दोन्ही ब्रिज साठी डेडलाईन आखली आहे. जुन्या धारवाड रोड येथील ब्रिज १७ डिसेंम्बर तर गोगटे सर्कल येथील ब्रिटिशकालीन ब्रिज चे बांधकाम २०१८ मार्च म्हणजेच सहा महिन्यात पूर्ण करा असा आदेश त्यांनी दिला आहे.
नवे ब्रिज ६० फुटांचे होईल यामुळे रहदारी चा प्रश्न मिटेल, बांधकाम खात्याने झाडे तोडून कामाला जागा करून द्यावी. ५००० बीएसएनएल च्या लाईन्स बंद असून त्या सुरळीत कराव्यात, अश्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
गोगटे सर्कल येथील ब्रिज च्या बाजूने फूटपाथ होईल. ज्या चार कुटुंबांनी या सरकारी जागेत अतिकर्मण केले आहे ते हटवले जाईल.असे ते म्हणाले.
एस बी आय च्या मुख्य शाखेकडून ब्रिज वर प्रवेश घेता यावा अशी व्यवस्था करण्याच्या सूचना आल्या, यावर ते आता शक्य नाही, कारण परत आराखडा बदलावा लागेल आणि केंद्राची परवानगीही लागेल असे अंगडी यांनी सांगितले.
/