आगामी सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षातील अनेक इच्छुकां कडून मतदारांना युवक मंडळांना साड्या वाटप,सार्वजनिक कार्यक्रमासाठी देणग्या दिल्या जात आहेत अश्याच बेळगाव दक्षिण मध्ये गुडग्याला बाशिंग बांधून निवडणूकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रीय पक्षातील एका उमेदवाराने गणेश मंडळास चेक द्वारे दिलेली देणगी न न वटल्याने सदर चेक बाऊन्स झाला आहे.त्यामुळे त्या इच्छुक उमेदवारां बद्दल गणेश मंडळाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या गणेश उत्सवात शहापूर बिचू गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळास कोरा चेक सही करून दिला होता त्या चेक बँकेत जमा केल्यावर बोऊन्स झाला आहे. चेक बोऊन्स ची माहिती देण्यासाठी सदर इच्छुकांस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला असता फोन उचलणे देखील त्याने टाळले आहे.बँक ऑफ इंडिया गोवा वेस बँकेचा चेक असून मंडळाला दिलेली देणगी केवळ 5 हजारांची आहे.
नोट बंदी नंतर कॅशलेस व्यवहारात वाढ झाली आहे त्यातच राजकीय नेत्यांनी चेक द्वारे दिलेल्या देणग्या न वटल्याने कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या या चेक बोऊन्स ची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Chq No 0000453638 for INR 5,000.00 issued frm AC XXXXX378105 dishonoured.Chrg INR 177.00 deducted. Download Buddy@ http://goo.gl/qUlXqL