सोलापूर येथे शिक्षण घेत असलेल्या बेळगावच्या रेवती श्रीकृष्ण मोरे या विध्यार्थीनींची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने परवड होत आहे. अत्यंत हालखीच्या परिस्थितीत सुद्धा तिने आपलं एम सी ए पूर्ण करण्याच शिक्षण चालूच ठेवले आहे.
वडिलांकडे उर्वरित फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एम सी ए च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या या विध्यार्थीनीने शिक्षण अर्धवट सोडण्याचा विचार चालवला आहे.तिचे वडील श्री कृष्ण मोरे यांनी देखील तिला पैश्याची व्यवस्था होत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून तू बेळगावला निघून ये असा संदेश धाडला आहे.श्रीकृष्ण मोरे हे बेळगाव येथील टिळकवाडी येथे रंगारीच काम करतात त्यांना स्वताच घर नसून भाड्याचे घरात राहतात घरचा प्रपंच मोठा असल्याने त्यांची अधिक ओढाताण होत आहे.अश्याही परिस्थितीत एक मुलगी बी एस सी करतेय तर मुलगा बी बी ए शिकत आहे अश्या स्थितीत आर्थिक बिकटतेमुळ रेवती वर एम सी ए अंतिम वर्षातील शेवटच्या सेमिष्टर ची फी भरता येत नसल्याने शिक्षाणा पासून वंचीत व्हायची वेळ आली आहे.तिला एम सी ए पूर्ण करण्यासाठी
एक लाख रुपयांची गरज आहे. सोलापूर येथील भरती विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बेळगावच्या कन्येला मदत करा अस आवाहन बेळगाव live करत आहे.
संपर्क-
श्रीकृष्ण मोरे
मोबाईल – 09538048459
08748889364