बेळगावच्या मातीतून मोती शोधायचे कार्य गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी केले आहे असे उदगार वाय बी चौगुले यांनी काढले,गर्लगुंजी गावचा धावपट्टू विश्वंभर कोलेकर यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते,अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील होते.
नाथ पै चौकातील सिद्धार्थ बोर्डिंग येथे शनिवारी ता २१ रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी प्रास्तविक करताना म्हणाले की विश्वंभर यांचे वडील लक्ष्मण कोलेकर हे मी गर्लगुंजी गावात शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना क्लार्क म्हणून काम करत होते, अशा परिस्थितीत त्यांनी ज्योती आणि विश्वंभर यांना धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन दिले आणि आज दोघांनीही उत्कृष्ट धावपट्टू म्हणून अनेक पदके प्राप्त केली आहेत.
आमदार संभाजीराव पाटील म्हणाले की मी अनेकांना आर्थिक सहाय्य केलो आहे, त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यानी राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे, जर तुला ऑलिंपिकला जाताना गरज वाटली तर आर्थिक सहाय्य करू अशी ग्वाही दिली.
ज्यावेळी ज्योती कोलेकर हिने अगदी लहान वयात पदक मिळवले तेंव्हा त्यावेळचे महापौर व सध्याचे आमदार संभाजीराव पाटील यांनी आर्थिक सहाय्य केले होते म्हणून ज्योतीने अनेक राष्ट्रीय सन्मान प्राप्त केले,
आणि आज तिचा भाऊ विश्वंभर कोलेकर यांचा सन्मानही आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते होतोय हा योगायोग आहे असे गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी सांगितले,
यानंतर आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते विश्वंभर कोलेकर याचा करंडक देऊन सत्कार केला.
यावेळी जवाहर देसाई,अॅड अशोक पोतदार, अनिल पाटील,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सिद्धार्थ बोर्डिंग, जायंट्स मेन, स्वातंत्र सैनिक उत्तराधिकारी संघ,कुस्तीगीर संघटना, टिळकवाडी हायस्कुल, अश्विनी लेंगडे, संत रोहिदास कॉलनी, यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
महादेव पाटील यांनी सुत्रसंचलन केले तर गोपाळराव बिर्जे यांनी आभार मानले.