११३ वर्षीय रेल्वे ओव्हरब्रिज चा मुख्य पूल हटवण्यात आला आहे. दिवाळी मुळे पुढचे काम थांबले, पुढील काम सोमवार पासून सुरू होणार आहे. कृषी इन्फ्राटेक कम्पनीने दिवसरात्र राबून मोठमोठ्या क्रेन च्या वापराने मोठा भाग हटवला आहे.
कंत्राटा प्रमाणे पी डब्ल्यू डी च्या अखत्यारीतील या जागेतील सर्व अडथळे दूर करावे लागणार, चौपदरी ब्रिज उभारायचे असल्याने शेजारी उभी राहून अनेक वर्षे सावली दिलेली २० ते २५ झाडेही कापावी लागणार आहेत.
रेल्वे खात्याने यापूर्वी काही ठिकाणी झाडे न कापता ती मुळापासून काढून इतरत्र लावली होती, याठिकाणी मात्र झाडे फारच मोठी असल्याने या पद्धतीचा वापर करता येत नाही असे कळते.
Trending Now