भ्रष्टाचार निर्मुलन परिवार तर्फे ऐन दिवाळीत आज सकाळी नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या निवडणुकात मी कोणत्याही परिस्थितीत भ्रष्ट राजकारण्याला मत देणार नाही, अशी शपथ घेऊन आज दिवाळी पाडव्याला भाग्यनगर भागातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.या निमित्ताने मराठी , कन्नड आणि इंग्रजी भाषेत स्टिकर तयार करून ते सर्वत्र लावण्यात तसेच वाटण्यात आले आहेत
भ्रष्टाचार निर्मुलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांनी ही मोहीम सुरू केली आहे. दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण आहे. या सणात नागरिकांना म्हणजेच या देशातील मतदारांना जागृत केल्यास भविष्यात होणाऱ्या निवडणुकात स्वच्छ उमेदवार निवडून आणता येतील, यासाठी ही मोहीम महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम भाजप नेते आणि निवडणूक निरीक्षक शंकरगौडा पाटील यांना स्टिकर देऊन या निवडणुकीत भ्रष्ट उमेदवारांना तिकिटे मिळणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष एन आर लातूर, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष उमेश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्यासारख्या अनेक जणांनी या मोहिमेत सहभागी होऊन साथ दिली.
भाग्यनगर परिसरातील घर घरात जाऊन जागृती करण्यात आली आहे.या भागातील नागरिकांनी साथ देऊन यापुढे मी भ्रष्टाचाऱ्याला मत देणार नाही अशी शपथ घेतली. ही मोहिम सतत सुरू राहील असे जाहीर करण्यात आले
Good start