दिवाळीचा पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्त. या निमित्ताने बेळगावच्या बाजारात कोटींची उड्डाणे होणार आहेत. गाड्या, दागिने आणि कॉम्पुटर मोबाईल सारख्या वस्तूंची खरेदी आज होणार आहे.
दरवर्षी पाडव्याच्या पूजा आणि जेवणावळी आटपून लोक बाहेर पडतात ते खरेदीसाठी. प्रत्येकजण आपापल्या परीने खरेदी करत असतो. नोकरदारांना बोनस मिळाला आहे, त्या पैशातून कुटुंबासाठी काहीतरी नवीन खरेदी करण्यासाठी पाडव्याचा मुहूर्त राखून ठेवलेला असतो. आज सगळेचजण खरेदीला बाहेर पडतात.
आता लवकरच लग्नाच्या मोसमाला सुरुवात होणार आहे, या निमित्ताने दागिने खरेदी आलीच, तर बरेचजण मुहूर्त साधून गुंतवणुकीसाठीही खरेदीवर भर देणार आहेत.
Trending Now