Tuesday, November 19, 2024

/

खादरवाडी धरणात बुडाला बालक

 belgaum

PIranwadiमामाच्या गावी दिवाळीला सुट्टीला आलेल्या एका बारा वर्षीय बालकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.
किरण विठ्ठल रामनावर वय 12 वर्षे राहणार अंकलगी अस मयत झालेल्या युवकाच नाव असून तो सहावीत शिकत होता.
घटना स्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार किरण हा बुधवारी सायंकाळी दीपावळी च्या सुट्टी निमित्य अंकलगी हुन पिरनवाडीला आला होता गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चार मुलासह तो पोहायला गेला होता त्यावेळी पाण्यात गेला असता पोहता न आल्याने तो बुडाला आहे.घटना समजताच ग्रामीण पोलीसानी धाव घेतली आहे तर दुपारी दीड वाजे पर्यंत अग्निशामक दलाचे जवान त्यांचा बुडालेला मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी बुडालेल्या मुलाच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.ग्रामिण पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.