Monday, January 20, 2025

/

सखींची अनाथ मुलांसोबत दिवाळी

 belgaum

सामन्या प्रमाणे अनाथ मुलांना पण दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी जाएन्ट्स ग्रुप ऑफ सखी च्या महिलांनी आपल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशीच फराळ आणि दिवाळीचे साहित्य वितरित केले.

Giants
बुधवारी नरक चतुर्थीच औचित्य साधून शहापूर येथील प्रज्वल अनाथ संस्थेच्या अनाथ मुला मुलींना घरघुती फराळ,चॉकलेट, नवीन कपडे,पणत्या दिवे तेल फटाके आकाश कंदील असे सर्व सणाचे साहित्य वितरित केले.
अनेकजण घरात शिल्लक राहिलेल्या फराळ दिवाळी संपल्यावर अनाथ मुलांना देत असतात मात्र सखी च्या महिलांनी सणा दिवशीच आपल्या घरात बनलेलच फराळ आणि दिवाळीचे साहित्य वितरित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे अशी माहिती जाएन्ट्स ग्रुप सखी मेन च्या अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे.

यावेळी राधिका कलघटगी,आरती शहा, मनीषा कारेकर, नम्रता महागावकर  आदी सदस्या उपस्थित  होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.