बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्याना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख रविकांत गौडा यांनी पत्रकारांना दिली आहे.
बैलहोंगल आणि खानापूर येथील घरफोड्या करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँग ला पकडण्यात पोलिसांना यश मिळवलं असल्याची माहिती रविकांत गौडा यांनी दिली.700 ग्रॅम सोन्याचे दागिने,2 किलो चांदीतर कार आणि दुचाकी सह तिघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
खानापूर आणि नंदगड भागातल्या वाढत्या चोऱ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या विशेष दलाची रचना करण्यात आली होती.त्यानुसार पोलिसांनी पारख ठेवत तुंगराज आचार्य 33,गणेश गोडे 23,मंजुनाथ रायकर 33 यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता घरफोड्याचा माहिती समोर आली आहे.
निपाणी पोलीस स्थानकात महाराष्ट्र गोवा आणि मिरज भागात अपहरण राईस पुल्लिंग व्यवसाय व्याजी आणि दरोडे अशी प्रवृत्ती असणाऱ्या मकसुत भोकरे 32,अकबर मिरजकर 25 आणि इस्माईल मोकाशी 30, यांना अटक करून त्यांच्या जवळील कंट्री पिस्तुल आणि 6लाख 50हजारांचा मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
गोकाक पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्या बाल गुन्हे गाराकडून 10 लाख 50 हजार किंमतीच्या वस्तू आणि दागिने जप्त केल्या आहेत. वरील प्रकरण तपास लावणाऱ्या पोलिसांना 20 हजारांचा बक्षीस जाहीर केलं आहे.