आधार कार्ड आणि शेतीत कोणकोणती पीक येतात याची माहिती ग्राम तालाठ्याला देऊन आपापल्या उताऱ्यावरील नो क्रॉप नोंद काढून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काहीं दिवसापासून शासनाने सात बारा उताऱ्यावर नो क्रॉप अशी नोंद प्रत्येक पिकाऊ जमिनीवर केली होती या अनुसार पिकाऊ जमीन कधीही संपादन केली जाण्याची भीती होती विविध संघटनानी अनेक आंदोलन निवेदन देऊन नो क्रॉप नोंद हटवा अशी मागणी केली होती.
जिल्हा प्रशासनाने मोजक्याच अवधी साठी नो क्रॉप नोंद उताऱ्यावरून हटवण्या चे सुरू केलं आहे यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात कोणकोणती पीक येतात याची माहिती आधार कार्ड व्हिलेज अकौंटट ध्या अस आवाहन ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आदींनी केले आहे.