आज नरक चतुर्दशी. दिवाळीचा महत्वचा दिवस. यामुळे आज पहाटे पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. सध्या हीच धामधूम सध्या सुरू आहे. अंगाला चोपून चापून तेल लावून आणि उटणे फासून अंघोळ केली जात आहे. प्रत्येक घरी ही परंपरा पाळली जाते.
नरकासुर नावाचा एक राक्षस होता. तो भरपूर अत्याचार करीत असे. त्याने पकडलेल्या राजदरबारच्या मुली बाळी आणि बायका पोरींची सुटका भगवान कृष्णाने वराह अवतार घेऊन केली.
हा पराक्रम करून येतांना अंगभर मळकटलेल्या कृष्णाला त्याच्या राण्यांनी सुवासिक तेल, उटणे आणि पाण्याने न्हाऊ घातले होते. तेंव्हापासून विजयाचा हा सण साजरा होतो आणि अभ्यंगस्नानाला महत्व दिले जाते.
तर बेळगावकर उठा आणि करा अभ्यंगस्नान.