रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू होऊन केवळ चार दिवस उलटले असताना रेल्वे अभियंत्यांनी सदर उड्डाण पुलाच काम नियोजित वेळेतच पूर्ण करू असा दावा केला आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचे कार्यकारी अभियंते रघुनंदन शेट्टी यांनी बेळगाव live शी बोलताना रेल्वे उड्डाण पुलाच काम ठरलरल्या म्हणजे 18 महिन्याच्या अवधीतच पूर्ण केलं जाईल यासाठी युद्धपातळी वर काम सुरू झालं आहे असेही ते म्हणाले.
या उड्डाण पुलाला केंद्र सरकारने 14 कोटी अनुदान मंजूर केले असून त्याच कंत्राट बंगळुरू येथील कृषी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे सध्या शहरात सुरू असलेल्या धारवाड रोड आणि रेल्वे ब्रिज ही दोन्ही काम एकाच कंपनीकडे असल्याने काम लवकर पुर्ण होण्यास मदत होणार आहे असेही ते म्हणाले.
दीपावली नंतर रेल्वे उड्डाण पुलाच सुरू करून लोकांची पुलावर होणारी कोंडी रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत अशी जनतेची मागणी होती मात्र काम सुरू करण्यास डि सी तात्काळ परवानगी दिल्याने आम्हाला हे काम सुरू करण्यास भाग पाडल वरिष्ठ अधिकाऱ्यांच देखील चांगलं सहकार्य या कामी मिळत असल्याचे ते म्हणाले.
15 मीटर रुंदीच होणार ब्रिज
ब्रिटिश कालीन ब्रिज हटवून त्या ठिकाणी 15 मीटर रुंदीच म्हणजेच जवळपास 50 फूट रुंद होणार असून उपलब्ध असलेल्या जागेवरच पुलाचे बांधकाम पूर्ण करणार आहेत त्यामुळे नवीन जागा संपादन करण्याचा सध्या तरी प्रश्न उदभवत नसल्याचे ते म्हणाले.