गेल्या दोन विधानसभा निवडणुकात आपापसातील मतभेदांमुळे बेळगाव ग्रामीण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला जागा गमवावी लागली होती, असे असताना यावेळेस आगामी निवडणुकीच्या सहा महिने अगोदरच तालुका समितीला दुहीच्या राजकारणा बरोबर गळतीचं देखील ग्रहण लागलं आहे.
दत्ता पवार सारखे समितीचे कार्यकर्ते भाजपकडे शिरल्यानंतर राजहंसगड सुळगे (ये) आणि बीजगरणी किणये या गावातील सिद्धप्पा छत्रे, एस एम बेळवटकर,मनोहर बेळगावकर ,मारुती डुकरे यांनी मागील एक महिन्यांपूर्वी सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला होता ,ही राजकीय घडामोड ताजी असतानाच काँग्रेस निवडणूक प्रभारी के वेणूगोपाल यांच्या बेळगाव दौऱ्या वेळी उचगाव मतदार संघाच्या समितीच्या विद्यमान तालुका पंचायत सदस्या मथुरा तेरसे या काँग्रेस मध्ये सामील झाल्या आहेत.
गेले काही दिवस तालुक्यातील कणबर्गी आणि हिंडलगा येथील नेत्यांच्या राजकारणाला आणि दुहीला जनता कंटाळली आहे त्यामुळेच समितीला गळती लागली आहे.मराठी अस्मिते साठी अश्या गळत्या रोखण्याची गरज असून हेकेखोर नेत्यांनी आपणच पुढे आणि इतरांना न सामावून घेण्याची भूमिका बदलायला हवी.बेळगाव live ने या नेत्यांच्या अनेकदा कानपिचक्या काढून देखील तालुका समितीचं नेतृत्व बोध घेत नसेल तर त्यांना आत्मघात करायचा आहे हे नक्की मानावं का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक जण संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस कडून होतोय मात्र समिती नेत्या कडून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न नाहीत, उलट काही नेते आपले कार्यकर्ते जाणीवपूर्वक काँग्रेसच्या वाटेला घेऊन जात आहेत की काय असा संशय येत आहे.
कार्यकर्ते एक आहेत मात्र केवळ या दोन नेत्यांच्या हेकेखोर पणाचा त्रास सीमा भागाला सोसावा लागत आहे. मुद्दाम हरण्यासाठी आपली प्यादी पुढं करत आहेत का?हा देखील प्रश्न सामान्य मराठी जनास सतावत आहे …का कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहेत याचा विचार चिंतन करायचं सोडून हा नको तो नको हीच भाषा हेकेखोर नेत्यांकडून होत आहे त्यामुळे आगामी विधानसभेत नव्या दमाचा उमेदवार न दिल्यास,लगेचच डॅमेज कंट्रोल न केल्यास समितीच्या पराभवाची हॅटट्रिक होईल यात तीळ मात्र शंका नाही.
अहो कु्पाकरुन क्म
मी काय सांगतो ते जरा ऐका व हे समीतीचे नेते कधी एक होणार पण नाहीत व सामान्य मराठी माणसाला एकोप्याण जगुही देणार नाहीत व मलातरी अस वाटतय की मराठी माणसाने अशा नेत्यांचा नाद सोडावा व आपणाला जे योग्य वाटतय तस करावे नाहितर हे आमचे
नेते स्वताची टिजोरी भरून घेण्यासाठी काय काय नाटक करतील व कधी राष्ट्रीय पक्षात सामील होतील हे सांगता येत नाही……….