मोदी जनतेची प्रचंड लूट करीत आहे. धर्म आणि जातीच्या तत्वांअवर फोडा आणि राज्य करा, हे ब्रिटिशांचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अशी सडकून टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल यांनी भाजपवर केली.
येथील धर्मनाथ भवनात रविवारी दि १५ रोजी ते बोलत होते. तेथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
वेणूगोपाल यांनी भाजप पक्ष ब्रिटिश सरकारचे धोरण अवलंबत आहे. दोन समाज, दोन भाषा , दोन धर्म असे मतभेद तयार करून राज्य करण्याचे मनसुबे रचले आहेत. फोडा व राज्य करा, हे भाजपचे धोरण आहे, मात्र ते जास्तदिवस टिकणार नाही कारण जनता ते ओळखून आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष राज्यात खूप चांगली कामगिरी करत आहेत. गरीब व सामाजिक बांधीलकी जोपासणारे हे सरकार आहे.हे सरकार जनतेच्या बाजूने आहे. यामुळे आपला पक्ष नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त करेल. भाजपला मतदार जवळ करणार नाहीत, असा टोलाही वेणूगोपाल यांनी हाणला.
यावेळी पालक मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार सतीश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी,आमदार आणि संसदीय कामकाज समितीचे प्रमुख गणेश हुक्केरी, लक्ष्मी हेब्बाळकर, अशोक पट्टण हे उपस्थित होते.
कर्नाटकात भाजपची सत्ता हा आवाज आता थंडावला आहे, म्हणूनच घरा घरात काँग्रेस योजनेला यश येत आहे, याचा विचार करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असाही सल्ला त्यांनी दिला.