खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज पाडविण्यात आले आहे. काम सुरू झाले आणि एक महत्वाचा मार्ग बंद झाला. आता प्रशासनाने सुचविलेले पर्यायी मार्ग हाच एकमेव पर्याय आहेत. यापुढील काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हे मार्ग धरून संयमाने प्रवास करावा लागेल.
# गोगटे सर्कल येथून काँग्रेस रोड मार्गाने गोवावेसकडे जाण्यासाठी पहिले रेल्वे गेट हा मार्ग असून तेथे फक्त जाण्याची एकेरी सोय राहील.
पहिल्या रेल्वेगेट कडून कलामंदिर, महात्मा फुले रोड, गुडशेड रोड, कपिलेश्वर किंवा एस पी एम रोड, वडगाव, शहापूर आणि येळ्ळूर या भागात जाण्याची सोय असेल.
#वरील सर्व भाग तसेच टिळकवाडी मार्गे बाहेर पडून काँग्रेस रोडकडे येण्यासाठी दुसरे रेल्वेगेटचा मार्ग एकेरी वाहतुकीस राखीव ठेवण्यात आला आहे. देशमुख रोड, नाथ पै उद्यान,टिळकवाडी पोलीस स्थानक या भागातून दुसऱ्या रेल्वे गेटकडे जाता येऊ शकते.
# शहापूर, वडगाव, महात्मा फुले रोड आणि गोवावेस सर्कल काढून येणाऱ्यानाही आरपीडी सर्कल, वरेरकर नाट्यगृह आदी मार्गाने जाऊन एकेरी मार्गाने दुसऱ्या रेल्वेगेट कडे जाता येईल.
दिवाळी नंतर काम सुरू झाले असते तर बरे झाले असते पण ते आता सुरू झाले असून पूर्ण होईपर्यंत संयम हेच उत्तर आहे, घोषणा केल्याप्रमाणे १० महिन्यात काम न झाल्यास नागरिक आणि वाहतूक यांना भयानक त्रास होणार आहेत.
पर्याय एकच नियोजन नसताना अंगडि साहेबांनी जी ब्रिज पाडवण्याची घिसाडघाई केली व दिवाळीच्या सणामधे जर का ट्राफिकची समस्या ऊदभवली तर जणतेने सरळ अंगडिंच्या घरावर मोर्चा काढला पाहिजेत………..