गेटमन साहेब झोपी गेले होते, रेल्वे स्थानकाकडून धडाडत निघालेली रेल्वे सेकंड गेटजवळ आली तरी त्यांना जाग आली नाही. शेवटी रेल्वे थांबवून स्वतः गेट बंद करून रेल्वे पुढे नेण्याची वेळ रेल्वे चालकावर आली होती.
शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
त्या गेटमन ला जागे करण्याचा प्रयत्न झाला पण तो उठला नाही. येथील एड हर्षवर्धन पाटील हे घटनास्थळी होते. त्यांनीही त्या रेल्वे चालकाला मदत केली, मात्र रेल्वे गेल्यावरही त्या गेटमनला उठवण्यात नागरिकांचा वेळ गेला.
आता रेल्वे खात्याने रात्रभर शुद्धीत आणि जागे राहणाऱ्या गेटमनची नियुक्ती करण्याची गरज आहे.