ब्रिटिशांनी बांधलेले आणि आत्ता पाडवून नव्याने बांधले जाणार असलेले खानापूर रोड वरील रेल्वे ओव्हरब्रिज अखेर ठीक रात्री बारा वाजता बंद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी पत्रक काढून याची कल्पना दिली होती. उध्यापासून काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, रहदारी पोलीस ठीक रात्री ११.४५ वाजता दाखल झाले आणि त्यांनी ठीक बारा वाजता ब्रिज वरील वाहतूक रात्री ठीक बाराच्या ठोक्याला बंद केले आहे
आज रात्री ११.५९ पर्यंत ज्यांनी कोणी या ब्रिज वरून प्रवास केला त्यांचा प्रवास या ब्रिटिशकालीन ब्रिज वरील शेवटचा प्रवास ठरणार आहे, आता काम सुरू होईल आणि जेंव्हा ब्रिज बांधले जाईल तेंव्हाच नव्या स्वतंत्र भारतीय सरकारी ब्रिज वरील पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे.
दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद झाली आणि प्रशासनाने सारेकाही पूर्व सूचना देऊन केले आहे, यापूर्वीही हे ब्रिज प्रायोगिक तत्वांवर बंद करून रहदारी नियोजनाची काळजी घेण्यात आली आहे.
आता काहीकाळ शहर वासीयांना त्रास सहन करावा लागेल, मात्र नवे ब्रिज हाती येणार असल्याने काही काळ संयमानेच या स्थितीचा सामना करण्या पलीकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
ब्रिज बांधून पूर्ण होईतोवर लोकांचे हाल होणार हे नक्की आहे.
फोटो सौजन्य-जाधव ब्रदर्स चव्हाट गल्ली बेळगाव
very nice good working belgaumlive team, also have to focus on graduate students how to get jobs than start his/her carrier
This request do well needful
Mallesh