बेळगावात बनलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जय महाराष्ट्र असा नवीन लोगो लिहिलेल्या पहिल्या टप्प्यातील 35 शिवशाही बस शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर कडे रवाना झाल्या आहेत.
बेळगाव तालुक्यातील देसुर जवळील अलमा मोटर्स मध्ये या नवीन शिवशाही बस तयार होत आहेत शेकडो बस बनवण्याचं काँट्रॅक्ट महाराष्ट्र शासनाने अलमा मोटर्स ला दिलं आहे त्यातील पहिल्या टप्प्यातील 35 बस आज महाराष्ट्राकडे रवाना झाल्या आहेत.अलमा मोटर्स मध्ये ईथोपिया श्रीलंका परिवहन मंडळाच्या च्या बस देखील तयार झाल्या आहेत