घरातून खेळता खेळता दीड वर्षीय चिमुरडी बालिका बेपत्ता झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कोंडस्कोप गावात घडली आहे.
सृष्टी पुंडलिक कुडचीकर अस या बालिकेचे नाव असून या प्रकरणी तिच्या वडिलांनी बागेवाडी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीत सृष्टी घरा समोर अंगणात खेळतेवेळी अचानक बेपत्ता झाली असून तिचे अपहरण झाल्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. पोलीस निरीक्षक एस सी पाटील अधिक तपास करताहेत