Saturday, November 23, 2024

/

उद्यापासून सुरू रेल्वे ओव्हरब्रिजचे काम आजपासून बंद होणार ब्रिज

 belgaum

british-RoB-belagaumब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या आणि धोकादायक बनलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्या साठी आज रात्रीपासून हे ब्रिटिशकालीन ब्रिज वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहे.

जिल्हाप्रशासनाने आज बैठक घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. हे काम लोकांना विश्वासात घेऊन सुरू करावे जून्या पी बी रोड चे उड्डाणपुलाच काम पूर्ण झाल्यावरच नवीन रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करा याशिवाय या भागातील शालेय विध्यार्थी आणि सामान्य माणसांना त्रास होईल असे काम करू नये अशी मागणी वारंवार झाली. गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांच्या कडेही याबाबत मागणी करण्यात आली होती.

 

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  उड्डाण पुला बाबत सामान्य जनतेला वेठीस धरू नका यावर तोडगा काढा अश्या सूचना दिल्या होत्या.

उत्तर भागात दुर्घटना घडली तर अग्निशामक दल आणि इमर्जन्सी एमबुलन्स सेवा पुरवताना ट्रॅफिक जॅम मुळे जीवित हानी झाल्यास खासदार की जिल्हा प्रशासन जबाबदार असा प्रश्न उपस्थित झाला होता.तर कन्नड नेते श्रीनिवास ताळूकर यांनी

खासदार सुरेश अंगडी हे रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून लवकर काम सुरू करण्यास दबाव आणत आहेत फक्त निवडणुकीत श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप करत गृह मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

या साऱ्यावर साधक बाधक चर्चा करून निर्णय झाल्याचे समजते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.