Monday, December 30, 2024

/

भर पावसात अडकलाय वीज कोसळण्याची शक्यता असल्यास काय करावं-वाचा

 belgaum

हवामान विभागामार्फत बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार नागरीकांनी स्वतःची तसेच जनावरांची काळजी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा:
१) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.
२) जवळ आसरा नसेल तर
पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.
३) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.
४) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.
५) वीज पडल्यास प्राथमिक उपचारा करीता मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.
६) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका:
१) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.
२) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.
३) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
४) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.