Saturday, November 23, 2024

/

बालदमा-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

डिसेंबर जानेवारीची सुखद थंडी, कोवळे ऊन, गरमागरम वाफाळणारा चहा याची मजा केवळ अवर्णनातील आहे. पण ही अशी थंउी आणि झोंबणारा वारा काही विशिष्ट व्यक्तींना विशेषतः काही लहान मुलांना मात्र नकोसा वाटतो. जेव्हा सामान्य माणूस पावसाळा किंवा हिवाळ्यातील थंडीची मजा घेत असतो, त्या वेळेस अशा काही लहान मुलांना साधा श्वाससुध्दा घ्यायला त्रास होत असतो. सुखाची शांत झोप घेण्याऐवजी ही मुलं धाप लागून तळमळत असतात याला कारण ’बालदमा’.
’बालदमा’ आणि ’दमा’ यात पुष्कळसे साम्य असून सूक्ष्मता फरक आहे. साधारणतः पाच वर्षाखालील काही मुलांना विषाणू किंवा जिवाणूंमुळे झालेल्या इन्फेक्शननंतर श्वासमार्गाच्या होणार्‍या आजारात श्वासनलिकेतून सुॅुंई, सुँई आवाज येऊ लागतो. धाप लागते. छाती आवळल्यासारखी होऊन पोट उडते, छातीतून घरघर आवाज येतो. अशिक्षित लोक याला ’पोट हबकणे’ अथवा ’पोटातले झाले’ असे म्हणतात. हाच तो बालदमा.
लहान मुलांच्या श्वासनलिकेचा व्यास अत्यंत बारीक असतो. आजारामुळे नलिकेला सूज आली आणि आकुंचन पावली तरी श्वासोच्छवासाचा त्रास होतो. मुलं जशी मोठी होतात, तसा श्वासनलिकेचा व्यासहसी वाएतो व प्रत्यक्ष धाप लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु 45 टक्के मुलांमध्ये मात्र हा विकार पूर्णतः जात नाही, त्यांना मात्र ’दमा’ होतो.
बालदमा होण्याची कारणे
अनुवंशिकता आणि इरही काही घटक बालदम्याला कारणीभूत ठरतात. काही ठराविक गुणसूत्रातून दमा एका पिढीतून दुसर्‍या पिएीत संक्रमित होऊ शकतो. एखाद्या मुलाला दम्याचा आजार होण्यासाठी श्वासनलिकांची अंतर्त्वचा संवेदनशील असणे हे अंगभूत असावे लागते. शिवाय अशा मुलांना त्रासदायक ठरणारे कित्येक अ‍ॅलर्जन्स आपल्या सभोवताली असतात. अनेक प्रकारचे विषाणू, जीवाणू, धूळ, धूर, गवताचे- फुलांचे परागकण, बुरशीचे सूक्ष्मजंतू, विशेषतः वाहनांमुळे होणारे प्रदूषण त्यात मग नायट्रोजन ऑक्साईड, त्यातच कार्बनमोनाक्साईड, कारखान्यातून निर्मित सल्फरडायॉक्साईड, मानवनिर्मित सूत, प्लास्टिक इ. अनेक घटकांमुळे दम्याची तीव्रता वाढते. श्वासनलिकांची अंतर्त्वचा हलकी व हळवी होऊन दम्याचा त्रास वाढतो.
लक्षणे- सुरूवातीला कुणाला साधी सर्दी होते. थोडा खोकला होतो व अचानक धाप लागून छातीत घरघर चालू होते. काही मुलांना सर्दी खोकल्याशिवाय फक्त दम लागणे, श्वास घेताना सुई सुई आवाज येणे असा प्रकार होतो. धाप लागणे, क्वचित उलटी होणे अशा लक्षणांमुळे मुलं अगदी त्रासली जातात. सारखा ताप येतो. मुलं चिडचिडी होतात. भूक मंदावते. छातीचा एक्सरे काढल्यास निदान निश्चित होते. रक्ततपासणीत इओेझिनोफिलस नावाच्या विशिष्ट सफेदपेशी वाढलेल्या आढळून येतात, हे अ‍ॅलर्जी असण्याचे लक्षण होय, दमा सुरू झाल्याचे अंतिम लक्षण म्हणजे श्वासनलिकेच्या छोट्या छोट्या शाखांना आतून सूज येते. स्नायू आकुंचन पावल्यामुळे श्वास घेताना कष्ट होतात. अतिशय खोकला येतो. श्वासनलिकेत कफ तयार होऊन घरघर होते. मानेतल्या स्नायुंवर ताण देऊन श्वास घ्यावा लागतो. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायॉक्साईड वाढतो व खूप वेळ उपचाराशिवाय राहिल्यास श्वसनक्रिया थंडावू शकते.
उपचार- वेळच्यावेळी होणार्‍या उपचाराला अतिशय महत्व आहे. लहान मुलांना अतिधाप लागलेली असल्यास अस्थालीन पंपसारखे कृत्रिम उपचार, नेब्युलायझर असे तात्काळ उपयोगी पडणारे उपचार तात्पुरते द्यावे लागतात. कारण त्यामुळे आकुंचन पावलेल्या श्वासनलिका प्रसरण पावून श्वास मोकळा होतो. मग त्यानंतर हा विकार पूर्णतः बरा करण्यासाठी होमिओपॅथी, बाराक्षार, निसर्गोपचार करता येतात.
Dr sonali होमिओपॅथि- अर्सेनिक अल्ब, इपेकॅक, नेट्रममूर, कालीकार्ब, कार्बोवेज, एकोनाईट, ब्रोमिअम, नॅट्रम सल्फ ही औषधे बालदम्याव अतिशय उपयुक्त आहेत. लहान मुलांच्या व्यक्तीवैशिष्ट्यानुसार ही औषधं ठराविक उपचारपध्दतीने दिल्यास बालदम्याचे समूळ उच्चाटन होऊ शकते

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.