येत्या चार दिवसात बेळगाव वेंगुर्ला रोड दुरुस्ती करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठी भाषिक युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन असा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव ते बाची असा कर्नाटक राज्याच्या हद्दीतील रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे.त्वरित चार दिवसाच्या आत खड्डे बुझवून रस्ता दुरुस्त करावा अस देखील निवेदनात म्हटले आहे.यावेळी मराठी भाषिक युवा आघाडीचे भाऊ गडकरी,अरुण कानूरकर,शिवराज पाटील महादेव पाटील मोतेश बारदेशकर आदी उपस्थित होते.