कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुनावणी च्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबत चर्चा केली आहे.
शनिवारी रात्री दिल्ली येथे राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि अड राजाभाऊ पाटील आणि वकिलांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बेळगाव सह सीमा भागात कश्या पद्धतीने मराठी जणांना भाषिक त्रास सहन करावा लागतो याची सविस्तर कल्पना गृहमंत्र्यांना देण्यात आली केंद्र सरकारने निःपक्षपाती भूमिका घेणे गरजेचे असल्याचं देखील त्यांनी पटवून दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शना नंतर गृह मंत्र्यांची भेट घेण्यात आली आहे.