बेळगाव सीमा प्रश्नी अनेक आंदोलनातून शाहिरी केलेले शाहीर लक्ष्मण बिळगोजी यांच वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मंगळवारी हलगा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुली असा परिवार आहे.
सीमा प्रश्नाच्या अनेक आंदोलनात सभा बैठकातून सातत्याने पोवाडे म्हणणे आणि समाज जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केलं होतं.कुळ कायद्यांच्या जनजागृतीसाठी देखील त्यांनी अनेक सभा बैठकी मधून आपल्या शाहिराचे कर्तब दाखवले होते.
केवळ बेळगाव सीमा भागच नव्हे तर मुंबई महाराष्ट्रातही त्यांनी सीमा प्रश्नाच्या आंदोलनात पोवाडे म्हटले होते.
लहानपनी माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळळी यांच्या प्रयत्नातुन त्यांना विश्व भारत सेवा समिती नोकरी मिळवली साधा सायकल फावडा घेऊन आलेला कामगार नंदीहळळी यांच्या प्रयत्नातून पंडित नेहरू हायस्कुल मध्ये नोकरी मिळवून दहावी पास केली आणि 30 वर्ष पंडित नेहरू हायस्कुल मध्ये क्लार्क म्हणून एक कार्यकर्त्या प्रमाणे सेवा बजावली.कोरे गल्ली शहापूर येथील शाहीर लक्ष्मण पाटील यांच्या सोबतही अनेकदा सीमा चळवळीत शाहिरी केली होती संयुक्त महाराष्ट्राच्या सीमा चळवळीतील या शाहिराच्या योगदानास बेळगाव live चा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण आदरांजली…
Trending Now