Tuesday, July 23, 2024

/

रेल्वे उड्डाण पुलाच झालं भूमिपूजन – पुन्हा लागणार बॅरिकेट्स

 belgaum

ANGDI bhumiबेळगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून 3 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज मंगळवारी दुपारी  खासदार सुरेश अंगडी यांनी भूमी पूजन करून या ब्रिजच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी काडा कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी खासदार सुरेश अंगडी आणि महापौर संज्योत बांदेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यात पोलिसांनी सादर केलेल्या रहदारी अहवालावर चर्चा करून मंगळवारीच ब्रिज च्या कामाचं भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या नुसार दुपारी दोन च्या सुमारास खासदार सुरेश अंगडी यांनी पूजन करून कामाची सुरुवात केली.
पुन्हा बसवणार बॅरिकेट्स
गेल्या आठवड्यात तीन दिवस प्रायोगिक तत्वावर बॅरिकेट्स बसवून ट्रॅफिकचा अहवाल पोलिसांनी तयार केला होता त्यानंतर जनतेतून आधी ओल्ड पी बी रोड उड्डाण पूल सुरू करा मगच रेल्वे पुलाच काम करा अशी जनतेतून मागणी करण्यांत आली होती. पुन्हा अंगडी यांनी मंगळवारीच भूमिपूजन करून उदघाटन केल्याने मंगळवारी रात्री पासून पून्हा एकदा रेल्वे उड्डाण पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळेच आगामी सहा महिने जनतेला पुन्हा ट्रॅफिक जॅम चा फटका सहन करावा लागणार आहे
पर्यायी व्यवस्था करा
अंगडी यांनी भूमिपूजन करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी खासदार अंगडी यांच्याकडे डेक्कन हॉस्पिटल जवळचा गुडसशेड रोड सुरू करा अशी मागणी करताच अंगडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना गुडस शेड रोड सुरू करा अशी सूचना करताच अधिकाऱ्यांनी गुडस शेड नवीन फाटक रोड सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच मंजुरी मिळताच हा रोड  सुरू करू अस आश्वासन दिलं.

SARvodayकाळी निशाण दाखवून निषेध
भूमी पूजन सुरू असताना  कन्नड संघटनांच्या कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर आणि सहकाऱ्यांनी  अंगडी यांचा काळी निशाण दाखवत निषेध केला.जनतेला ट्रॅफिक जॅम चा त्रास होणार असल्याचा आरोप करत काळी निशाणे दाखविली ओल्ड पी बी रोड ब्रिज काम पूर्ण करूनच रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करा अशी मागणी करत अंगडी यांना घरचा आहेर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.