गेली 15 वर्ष बेळगावची खासदारकी भूषवत असलेले माननीय खासदार सुरेश अंगडी यांना एकाने खुलं पत्र लिहिलं असून त्या द्वारे त्यांच्या कडे तुरमुरी गावात एक दिवस वास्तव्य करा अशी मागणी करण्यात आली आहे.
काल खासदार साहेबांनी शहरात स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शवला होता हे करत असताना गेली कित्येक वर्षे तुरमुरी येथील ग्रामस्थ घाणीच्या साम्राज्यात वावरत आहेत याचा जरा विचार करा अस त्या पत्रात म्हटलं आहे. गेली 12 वर्ष या भागातील लोकांनी स्वच्छतेसाठी आंदोलन लढे केलेत जेल सोसलाय तरी देखील त्यांना न्याय मिळाला नाही
त्यामुळं या कचरा डेपो कडे लक्ष देऊन या गावातली स्वच्छता हाती घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.