विजयादशमी दिवशी हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारूती मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम झाला यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.वडगांव जुनेबेळगाव व अनगोळ येथील मानाच्या पालख्या वाजत गाजत आल्या त्याचं व भाविकांचे स्वागत मंदिराच्या आवारात ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी पारंपरिक पद्धतीनं सोन लुटण्यात आलं अंनगोळ वडगांव शहापूर भागातील हजारोच्या संख्येनी सहभाग दर्शवला होता.यावेळीअनेकांनी अल्लीपाक खाणे पसंद केले
यावेळी घुमट माळ मारुती मंदिर ट्रष्टी अध्यक्ष नेताजी जाधव,उपाध्यक्ष गोपाळ राव बिर्जे, सचिव कुळदीप भेकने, सभासद नकुल सोमनाचे बाबुराव पाटील, प्रकाश फ्लहोद, सुनिल चौगुले, रामभाऊ कुटरे, संभाजी चव्हाण, अनंत लाड, रघुनाथ बांडगी, मोहन मेलगे आदींनी स्वागत केले.