
दसऱ्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीनं काढण्यात येणारी पालखीची सुरुवात चव्हाट गल्लीतून करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग देवदादा सासनकाठी आणि नंदी ज्योती कॉलेज मैदानात सीमोल्लंघनासाठी गेल्यावरच बन्नी मोडण्याची परंपरा आहे याचं पालखीची चव्हाट गल्लीतून उत्साहात सुरुवात करण्यात आली.
महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंच मंडळींच्या वतीनं महापौरउपमहापौरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गेली कित्येक वर्षे ही पालखी चव्हाट गल्लीतून निघत असते चव्हाट शेट्टी गल्ली खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्लीत गेल्यावर तिथून ज्योती कॉलेज मैदानात ही पालखी जाते मग तिथेच सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो.
यावेळी सरपंच माधवराव मोहिते विकास कलघटगी ,रणजित चव्हाण पाटील भाजप नेते अनिल बेनके, नगरसेवक पुंडलिक परिट, आदी उपस्थित होते.नंदी ची सजावट करून विशेष पोशाखा सह युवक पालखीत सहभागी झाले होते.





