रेल्वे उड्डाणपुला बाबत ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांनी ट्रॅफिक अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती त्यानुसार मारिहाळ यांनी पोलीस आयुक्तांना अहवाल दिला आहे पोलीस आयुक्त यावर दोन दिवस अभ्यास करून तो अहवाल डी सी कडे सोपवणार आहेत त्यानंतरच जिल्हाधिकारी उड्डाण पुलाच काम कधी सुरू करणार ते ठरवणार आहे.बेळगाव live ला मिळालेल्या माहितीनुसार लागलीच जरी ब्रिज चे काम सुरू झाले तर पोलीस प्रशासन परिस्थिती ट्रॅफिक नियंत्रण हाताळायला सक्षम आहे मात्र पोलिसांना अजून कुमक ची गरज आहे.वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीची बदलाची चिन्ह बोर्ड लावणे तसेच आणखी बदल अहवालात सुचवण्यात आले आहेत त्यामुळे दिवाळी नन्तर देखील हे ब्रिज चे काम सुरू होऊ शकते अशी शक्यताही आहे.
सण उत्सव काळात गर्दीने गैरसोय नको ही काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तात्पुरत्या स्वरूपात ब्रिज बंद करून अभ्यास करणे हाच उद्देश होता, याबद्दल विनाकारण अफवा पसरविण्यात येत होत्या, काहींनी तर नागरिकच विकासाला अडथळा निर्माण करत आहेत अशी शक्यता व्यक्त केली होती, आता साऱ्याच चर्चा थांबल्या आहेत.
फोटो सौजन्य-ऑल अबाऊट बेलगाम