बेळगाव live ने दिलेली बातमी खरी ठरली आहे. रेल्वे उड्डाण पुलाचे काम डिसेंम्बर नंतरच होणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.
गुरुवारी मध्यरात्री 12 नंतर रेल्वे उड्डाण पुलावर घातलेले बॅरिकेट्स हटवण्यात आले असून हा पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.गेल्या चार दिवसांपूर्वी ट्रायल बेस वर रेल्वे उड्डाण पुलावर बॅरिकेट्स घालून पूल बंद करण्यात आला होता.
रेल्वे उड्डाण पुलाच काम कधी सुरू होणार यावर सिटीजन कौन्सिल ने रेल्वे अभियंत्यांची घेतलेली भेट निर्णायक ठरली आहे त्यानंतर बेळगाव live सर्वात आधी सोशल मीडिया वर दिलेली बातमी पुन्हा एकदा खरी ठरली आहे.
सिटीजन कौन्सिल ने जिल्हा प्रशासनाला ट्रॅफिक मॅनेजमेंट रिपोर्ट दिला होता तो देखील बेळगाव live नेच सर्व प्रथम मांडला होता.गुरुवारी विविध संघटनांनी निवेदन दिले होते ते देखील बेळगाव live ने सर्व प्रथम मांडले होते
उड्डाण पुला बाबत सगळीकडे माध्यमातून वेगवेगळ्या माहिती येत असताना बेळगाव live ने अचूक बातमीचा वेध घेतला होता …अन बेळगावकरांची ट्रॅफिक ची कटकट कमी होणार अश्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.त्यानुसारच पोलीस प्रशासनाने रेल्वे उड्डाण पूल बॅरिकेट्स हटवून वाहतुकीसाठी खुले केले आहे. मात्र या सगळया वर जिल्हाधिकारी एस जिया उल्ला हेच काम कधी सुरू करायचं आहे याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत.