किल्ल्यातील श्री रामकृष्ण मिशन आश्रमात दुर्गाष्टमी निमित्य संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सव्वा सहा ते दुपारी एक या कालावधीत,उषा कीर्तन विशेष पूजा ललित सहस्त्रणाम पारायण,होम वेदघोष भजन प्रवचन पुष्पांजली नामसंकीर्तन मंगळारती, झाल्या नंतर प्रसादाचे भविकात वितरण करण्यात आले.
त्यानंतर दुपारच्या सत्रात देवीची स्तुती विशेष आरती भजन नामावली असे धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.दुर्गाष्टमी निमित्य दुर्गामाता प्रतिमेची विशेष सजावट करून विशेष पूजा करण्यात आली.स्वामी आत्मप्राणानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले.