रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करण्याआधी ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी पर्यायी मार्गाची व्यवस्था प्रशासनाने करावी आणि जुन्या पी बी रोड ब्रिज लोकार्पण झाल्यावरच रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करा असा ठरावा द्वारे मागणी बुधवारी मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत मागणी करण्यात आली.
माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
रेल्वे उड्डाण पुलाच्या काम सुरू करा मात्र पर्यायी रास्ता काढा अश्या अनेक मागण्यासाठी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांच्याशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी दुपारी12 वाजता विविध संघटनाच्या वतीने निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे.मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत अनेक संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.जनतेची गैरसोय टाळण्यासाठी
गुडशेड रोड आणि भांदुर गल्लीत बंद असलेलं गेट तात्पुरता सुरू करावेत आणि रेल्वे उड्डाण पुलावरील ट्रायल बेस वर बंद केलेले बॅरिकेट्स हटवावे हा रोड जुने पी बी रोड ब्रिज पूर्ण होई पर्यंत ट्रॅफिक साठी खुले करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली
Trending Now