भारतातील रेल्वे सेवेची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. देशातील पहिली रेल्वे धावली होती १६ एप्रिल १८५३ ला, मुंबई येथील बोरी बंदर ते ठाणे हा ३४ किमीच्या प्रवासाचा तो टप्पा होता,
लोंढा ते बेळगाव हा रेल्वेमार्ग २१ मार्च १८८७ रोजी खुला झाला, मिरजेच्या रेल्वे स्थानकापासून बेळगाव रेल्वे स्थानक हे १३८.२१ किमी म्हणजेच तेंव्हाच्या भाषेत ८५.८८ मैल हे अंतर १८८७ च्या डिसेंबर पर्यंत जोडण्यात आले.
१८८६ सालात पुणे ते लोंढा हा मिरजमार्गे रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू झाले होते, दक्षिण मराठा रेल्वे खात्याच्या सांगली विभागातर्फे हे काम झाले.
कुंभारिया चे जेराम जगमल आणि मंजि हिरा तसेच चांदियाचे विश्राम कर्मन यांनी बेळगाव ते सांगली हा टप्पा पूर्ण केला होता, तेंव्हा सांगली संस्थान होते आणि या संस्थानचे एक केंद्र बेळगाव हे ही होते म्हणून हा भाग बेळगाव सांगली असा ओळखला जात होता.
विजयनगर, उगार खुर्द, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, बागेवाडी, घटप्रभा, परकनहट्टी, पाछपूर, सूळेभावी या स्थानकांना ९० मैल अंतराच्या रेल्वे मार्गाने जोडले गेले.
ब्रिटिशांनी हे काम फक्त एक वर्षात पूर्ण केले होते.
माहिती स्रोत: सांगली जिल्ह्याचे गॅझेट