रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केल्या नंतर पहिल्याच दिवशी शहरात उडालेली रहदारीची कोंडी लक्षात घेता या संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी विविध सामाजिक संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहात याबैठकीच आयोजन करण्यात आलं आहे.
पहिले रेल्वे फाटक दुसरं रेलवे फाटक, तानाजी गल्ली रेल्वे फाटक आणि कपिलेश्वर उड्डाण पुलावर शनी मंदिर आणि एस पी एम अश्या विविध ठिकाणी ट्रॅफिक जॅम होत आहे या सगळ्या पाश्वभूमीवर निर्णय घेण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील सर्व सामाजिक संस्थानी सहभाग घ्यावा असे आवाहन अड अशोक पोतदार माजी महापौर नागेश सातेरी,माजी नगरसेवक नेताजी जाधव,मराठा मंदिरचे शिवाजी हंगीरगेकर,भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मुळगुंद यांनी केले आहे