नवरात्रीनिमित्त बेळगावात कोल्हापूरच्या अंबाबाईची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून सध्या भाविक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत . रामलिंगखिंड गल्लीतील शंभू जत्ती मठासमोर २० फूट उंचीची अंबाबाईची मूर्ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे . गरुडावर आरूढ झालेली अंबाबाईची मूर्ती पाहिली की भाविकांचे हात आपोआप जोडले जातात . अगदी अंबाबाईच्या मूर्तीसारखीच हुबेहूब मूर्ती बेळगावातील मूर्तिकार वसंत पाटील यांनी उभारली आहे . हिटलॉन आणि स्टीलचा सांगाडा तयार करून मूर्ती तयार करण्यात आली आहे .
Less than 1 min.
Previous article
Next article