बेळगाव शहरातील ब्रिटिश कालीन रेल्वे उड्डाण पूल lc126 रहदारी साठी बंद करण्यात आला आहे.एका बाजूने मराठा मंदिर समोर तर दुसऱ्या बाजूने गोगटे सर्कल जवळ अशी दोन्ही बाजूने बॅरिकेट्स घालण्यात आले आहेत.24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री हे बॅरिकेट्स घालण्यात आले असून या रोड वरील सर्व प्रकारची रहदारी बंद करण्यात आली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 2 ते 3 दिवस ट्रायल म्हणून या ब्रिज वरील रहदारी बंद करण्यात आली असून सर्व ट्रॅफिक काँग्रेस रोड वरून वळवण्यात आली आहे. शहरात तीन दिवस कुठं कुठं ट्रॅफिक वर कुठं ताण पडतोय याचा अभ्यास केला जाणार आहे