संभाजी नगर वडगाव येथील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण माध्यमे आणि मनपा पर्यंत पोचविल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांना माजी नगरसेवक नेताजी उर्फ बाळू मनगुतकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणात जाधव यांनी मनगुतकर यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून संरक्षणाची मागणी केली आहे.
संभाजी नगर येथे एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी या बद्दल मनपाकडे तक्रार केली, याची बातमी तरुण भारत या दैनिकात छापून आली, या मागे सुनील जाधव हेच असल्याचा समज करून घेऊन मनगुतकर यांनी त्यांच्या चव्हाट गल्ली येथील घरात शिरून आई व पत्नीला धमकी देत त्याला आवरा नाहीतर तुकडे करीन अशी भाषा केली.
अट्रोसिटी कायद्यांत अडकवतो, हाडे मोडतो, सम्पवून टाकतो आशा धमक्या देण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक नेताजी उर्फ बाळू यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
Trending Now