संगोळी रायन्ना सोसायटीत कोट्यवधी रुपयांच्याच्या भ्रष्टाचारात आरोपात अडकलेल्या अप्पगोळ यांच्या बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला असून सहकार खात्याच्या वतीनं पोलिसात दाखल करण्यात आलेली एफ आय आर ला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आला आहे.
संगोळी रायन्ना संस्थेचे अध्यक्ष अप्पूगोळ यांच्यासह 16 जणांवर दाखल करण्यात आलेली एफ आय आर लाच स्थगिती मिळाली आहे गेल्या 4 सप्टेंबर रोजी सहकार खात्याने अधिकाऱ्यांनी रायन्ना संस्थेवर आणि त्यांच्या अध्यक्षावर केस दाखल केलीं होती यामुळे खडे बाजार पोलिसात गुन्हाच नोंद करण्यात आला होता याच्या आधारावर आनंद अप्पूगोळ यांना मुंबईत अटक करून बेळगावला आणण्यात आले होते
सहकारी खात्याच्या नियम 64 आणि 65 नुसार पोलीस केस करण्या अगोदर चौकशी करा अशी सूचना कोर्टाने सहकार खात्याला दिली आहे त्यामुळे अप्पगोळ यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे
Trending Now