ज्यांना कोल्हापूर अंबाबाईच दर्शन घेता येत नाही ते बेळगावातील भाविक नाथ पै सर्कल येथील अंबाबाईचे दर्शन घेत असतात.115 वर्ष जुने आ हे अंबाबाईचे मंदिर शहरातील जागृत आणि पुरातन मंदिरा पैकी एक आहे .एस एस के सावजी समाजाचं हे मंदिर आहे.
गेल्या काही वर्षांत चार मजली इमारत नूतनीकरण केली आहे मात्र मंदिराचा गाभारा 115 वर्ष जुनाच आहे.
शहापूर भागातील हिंदू समाजातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेत असतात जे भाविक मागणी करतात त्यांची मागणी पूर्ण होत असल्याने नवसाला पावणारी देवी म्हणून देखील ख्यात आहे.
दरवर्षी नवरात्रीत मंदिराची खास सजावट करण्यात येते नऊ दिवस देवीला वेगवेगळी रूप देण्यात येतात पहिल्या दिवशी मच्छ अवतार तर दुसऱ्या दिवशी देवी कमळातून प्रकट होते तर दुर्गाष्टमी दिवशी पूर्णावतार करण्यात येतो अशी माहिती मंदिराचे ट्रष्टी पांडुरंग कृष्णासो भांडगे यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली आहे