शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या वतीने बेळगावात आयोजित दुर्गामाता दौड ला दुसऱ्या देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले होते.
टिळकवाडी शिवाजी कॉलनी येथुन दौड सुरू झाली सुरुवातीला नगरसेवक अनंत देशपांडे यांनी सुरुवातील भगवा ध्वज चढविला तर नगरसेवक मोहन भांदुर्गे आणि माजी नगरसेवक किरण परब यांनी अनगोळ येथे ध्वज उतरविला.
शिवाजी कॉलनी,पापा मळा,चौगुलवाडी सोमवार पेठ देशमुख रोड आणि अनगोळ भागात दौड फिरल्यावर अनगोळ महालक्ष्मी मंदिरात सांगता झाली.
शनिवारी दौड चँनम्मा चौक गणेश मंदिरात सुरुवात होणार असून खडक गल्ली चव्हाट गल्ली,शिवाजी नगर गांधी नगर भागात फिरणार असून किल्ला दुर्गामाता मंदिरात सांगता होणार आहे.