Sunday, November 24, 2024

/

बेळगावात पाच बालके जाणार होती बळी!

 belgaum

गुप्तधन मिळविण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळक्यापैकी एका महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. तिचे चार साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकारात १४ महिन्याच्या बालिकेला वाचवण्यात यश आले आहे.
भडकल गल्लीतील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अंधश्रद्धेचा कळस ठरली आहे.चौदा महिन्याच्या मुलीसह आणि चार बालकांना नरबळी देण्यासाठी तयारी सुरू होती.राहत्या भाडोत्री घरातच आठ फूट खोल आठ फूट रुंद खड्डा खणला होता.चौदा महिन्याची घरमालकाची मुलीला बळी देण्यासाठी पकडून ठेवले होते.बऱ्याच वेळेपासून मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध करताना मुलीच्या रडण्याचा आवाज आला आणि नरबळी देण्याचा प्रयत्न फसला.महालय अमावस्येच्या मुहूर्तावर एकूण पाच मुलांचा नरबळी देण्याची योजना होती.एक महिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्य चौघांचा शोध जारी आहे.NArbali 2याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की,
खतीजागौस पिरजादे (१४ महिने) हिला बळी देण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली होती, तिला वाचवण्यात यश आले आहे. शिरीना जमादार असे त्या महिलेचे नाव आहे, तिला तोंडाला काळे फासून मारहाण करण्यात आली असून पोलिसांनी अटक केली आहे. पाच मुलांना एक वेळी बळी दिल्यास गुप्तधन मिळणार या आशेतुन त्यांनी हा प्रकार सुरू केला होता. मासाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला, सोना मुल्ला हे फरार झाले आहेत. आपण भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकाचीच मुलगी गायब करून तिला बळी देण्याचा प्रयत्न तिने सुरू केला होता. खतीजा काल रात्रीपासून गायब झाल्याने तिचा शोध घेण्यात येत होता, यावेळी तिचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीला आला.NArbali 3(बालकांचा बळी देण्यासाठी काढण्यात आलेला खड्डा)

आज जग आयटी युगाकडे जात असताना गुप्तधनाच्या आशेने असला प्रकार करणारे अंधश्रद्धाळू असून त्यांचा धोका समाजाला मोठा आहे, वेळीच हा प्रकार उघडकीला आला नसता तर त्या बालिकेसह पाच निष्पाप बालकांचा बळी गेला असता. दरम्यान असा प्रकार लक्षात आल्यास नागरिकांनी तातडीने तो उघडकीस आणण्याची गरज असून लहान मुलांची योग्य काळजी यापुढे घ्यावी लागणार आहेNArbali 4  (हीच ती पोलिसांनी अटक केलेली महिला जिला लोकांनी  काळे फासून मारहाण केली)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.