अहिंसा परमो धर्म म्हणून ज्या भगवान महावीरांनी जैन धर्म पुढे नेला त्याच पाउल वाटेवरून चालत जाऊन समाजसेवेचा वसा येथील राजेंद्र जैन जपत आहेत. या वाटेवर मार्गक्रमण करताना नुकतीच त्यांनी ६२ वर्षे पूर्ण करुन ६३ वा वर्षी पदार्पण केली आहे आज पर्यंत त्यानी ६३ वेला रक्तदान केले आहेत। बेळगाव live तर्फे आठवड्याचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
राजेंद्र पी जैन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५५ चा, बीएससी, डीबीएम हे शिक्षण पूर्ण करताना ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यांच्या
जीवनाचे ध्येय *”जिसका कोई न हो, उसके तुम बनो”* *”न्यूनतम लेना, अधिकतम देना”* असे आहे.
@ कार्य क्षेत्र: आरोग्य, शिक्षण, जीवदया आणि साधू-संत मंडळींची सेवा।
@ जन्म भूमी: ईलकल, कर्नाटक.
@ कर्म भूमी: बेळगाव
@व्यक्तित्व: कर्मठ, विश्वसनीय, हितैषी, तापस भाव, विलक्षण प्रतिभा, आराधक, कुशल व्यवस्थापक, अहिंसक, गोरक्षक, जीव दया साधक
विलक्षण साधक, विघ्नहर्ता म्हणून ख्याति आपात सेवी, त्यागी, मनसा-वाचा-कर्मणा समर्पण।
@ प्रवचनकार, निस्प्रूह, निर्विकार, धारा प्रवाह मधुर वाणी
@ मौलिक विचार व सिद्धांतांचे धनी
@ भगवान महावीर भक्त, सदा जन सेवेत अनुरक्त
@ जीवनदायिनी चिकित्सा सेवेत लीन
@ मानवता चे प्रचारक
@ दुर्व्यसना पासून दूर, अहंकार व दुर्गुणापासून अतिदुर।
@ सच्चे सल्लागार, साधे जीवन उच्च विचारसरणी।
कृतित्व: राजेंद्र जैन यांनी निस्वार्थ भावाने एक कर्म योगी प्रमाणे अनेक सेवाकार्ये केली आहेत. बहुआयामी सेवांचे त्यांचे क्षेत्र व्यापक आहे. साधू-संतयांचा सेवा असो, साध्वीन्च्या दुर्दैवी अपघाताचा प्रसन्ग असो, कारगिल युद्ध असो तन-मन- धन हरपून त्यांनी काम केले असून त्यांची कामे सांगताना शब्द अपुरे पडतात.
त्याना बरेच पुरस्कार मिळाले आहेत त्यात काही विशेष पुरस्कार
१. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार २००२.
२. महात्मा महावीर पुरस्कार २००५.
३. समाज भूषण पुरस्कार २००७.
४. समाज रत्न पुरस्कार २०१०.
५. प्राईड आफ बेलगांम पुरस्कार २०१२.
६. गोरक्षक पुरस्कार २०१४.
७. श्रावक रत्न पुरस्कार २०१६.
# ४० हुन अधिक संस्थांशी ते जोडले गेले आहेत त्यापैकी काही संस्था।
१. अध्यक्ष, श्री महावीर ब्लड बँक
२. अध्यक्ष, प्राणीदया संघ, बेळगाव
३. सचिव, समस्थ जैन समाज
४. खजिनदार, एस.पी.सि.ए. बेळगाव
५. ई.सी. मेम्बर, बेळगाव डिस्ट्रिक्ट असोसिएशन फोर दि ब्लाईंड