शिवाजी महाराजांचा नवा पुतळा तयार करण्याचं श्रेय लाटण्यावरून कडोली गावात काँग्रेस आणि समितीत राजकारण पहावयास मिळालं आहे.आता राजहंसगड येथे जुन्या पुतळ्याला चीर गेले असे कारण पुढे करून काँग्रेस चे राजकारणी पुढे आलेत, याला एक गटाचा विरोध असून काहीजण फुकटचे पैसे मिळतात तर नवा शिवाजी पुतळा बसवू या मानसिकतेत आहेत,शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण सुरू झाले आहे.
शिवाजी महाराज म्हटले की मराठी अस्मिता जागी होते ती अस्मिता मतांमध्ये परावर्तित करून घेण्यासाठी राजकीय पक्षांचे गणित सुरू आहे, अशा स्थितीत काँग्रेसलाही शिवाजी महाराजांचा पुळका आला आहे, लोकांनी हे वेळीच ओळखून सावध होणे महत्वाचे आहे.
ग्रामीण भागात शिव मूर्ती बसवण्या वरून राष्ट्रीय पक्ष विरुद्ध समिती असा संघर्ष सुरु आहे काँग्रेसची महाराजांच्या मुर्तीं साठी बऱ्याच ठिकाणी आर्थिक सहाय्य करत आहेत त्यातून राजकारण सुरू आहे.
शिवाजी महाराजांचे पुतळे गावात त्यांचा आदर्श घेण्यासाठी बसवले जातात मात्र कडोलीत पुतळा बसवतानाच राजकारण श्रेयवाद पहावयास मिळाल्याने महाराजांचा पुतळा बसवण्याचा मूळ उद्देश्य हरवला आहे अशी टीका या वाद करणाऱ्या दोन्ही गटातील नेत्यावर होत आहे.
आता राजहंसगड येथेही शिवाजी महाराजांची मूळ शिकवण सांगण्याची वेळ आली आहे. स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी रयतेने राजकारणी संधीसाधूचे पाय धरणे योग्य नाही. महाराज मना मनात आहेत, त्यांचे राजकारण नको, शिवाजी महाराज की जय म्हणून मते मागणाऱ्यापासून सावध व्हा, हेच बेळगाव live चे सांगणे.